भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी


भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी ॥धृ॥

राजा वदला , “मला समजली शब्दांवाचुन भाषा

माझ्या नशिबासवे बोलती, तुझ्या हातच्या रेषा ”

कां राणीच्या डोळा तेव्हा, दाटुनी आले पाणी ? ॥१॥

राणी वदली बघत एकटक दूर दुरचा तारा

“उद्या पहाटे दुसऱ्या वाटा, दुज्या गांवचा वारा “”

पण राजाला उशिरा कळली गूढ अटळ ही वाणी ॥२॥

तिला विचारी राजा, “ कां हे जीव असे जोडावे ?

कां दैवाने फुलण्याआधी फूल असे तोडावे ?”

या प्रश्नाला उत्तर नव्हते, राणी केवलवाणी ॥३॥

कां राणीने मिटले डोळे दूर दुर जाताना ?

कां राजाचा श्वास कोंदला गीत तिचे गाताना ?

वाऱ्यावरती विरुन गेली एक उदास विराणी ॥४॥

vitthala tu veda kumbhar


फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार
विठ्ठला, तू वेडा कुंभार

माती पाणी, उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा
आभाळच मग ये आकारा
तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार

घटा घटांचे रुप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे
तुझ्याविणा ते कोणा न कळे
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार

तूच घडविसी, तूच फोडीसी, कुरवाळीसी तू तूच ताडीसी
न कळे यातून काय जोडीसी
देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार

नसे तुझा देह चंदनाचा, न हे तुझे ओठ केशराचे


नसे तुझा देह चंदनाचा, न हे तुझे ओठ केशराचे
पुसून जातात संधिकाली कधी कधी रंग मेकपाचे!

असाच प्रत्येक आरतीतून आणला हा करून चोरी
म्हणून आता तयार झाले घरातले ढीग कापराचे!

करून संसार मी तुझा फक्त भारवाहू हमाल झालो
वहाण माझी अशीच फाटे करून फेरे किती घराचे !

निमूट ऐकून घ्यावयाला कुणीतरी लाडका हवा ना?
रडून ती दाखवी स्वतः का असून काळीज पत्थराचे!

तुझ्यासवे बोलतो तरी मी, तिला कधी भेटलोच नाही
कबूल ह्या प्रेमिकास आता तुझ्यात अस्तित्व सायराचे

कधी कधी मांजरेच काही चढून तोऱ्यात जात होती
घरात झालेच माणसांना उगाच आभास वानराचे!

तुझ्या नि माझ्या झटापटींच्या घडून गेल्या कितीक फेऱ्या
हवीहवीशी तुझी चढाई, असे सदा बोल अंतराचे

[आधारित- कधी तुझा देह चंदनाचा, कधी तुझे ओठ केशराचे- चित्त]
……………… कारकून

Read more: