Shwas hota Shwasat tewha


Advertisements

बघ माझी आठवण येते का?


मुसळधार पाऊस खिडकीत उभं राहून पहा
बघ माझी आठवण येते का?

हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी
इवलसं तळं पिऊन टाक
बघ माझी आठवण येते का?

वार्‍याने उडणारे पावसाचे थेंब चेहर्‍यावर घे
डोळे मिटून घे, तल्लीन हो
नाहिच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये
तो उधाणलेला असेलच, पाण्यात पाय बुडवून उभी रहा
वाळू सरकेल पायाखाली, बघ माझी आठवण येते का?

मग चालू लाग, पावसाच्या अगणित सुया टोचून घे
चालत रहा पाऊस थांबेपर्यत, तो थांबणार नाहिच, शेवटी घरी ये
साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये
आता नवर्‍याची वाट बघ, बघ माझी आठवण येते का?

दारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेल
त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढ़ेल
तो विचारेल तूला तुझ्या भिजण्याचं कारण, तू म्हणं घर गळतयं
मग चहा कर, तूही घे
तो उठून पंकज उधास लावेल, तो तू बंद कर
किशोरीचं सहेलारे लाव, बघ माझी आठवण येते का?

मग रात्र होईल तो तुला कुशीत घेईल, म्हणेल तू मला आवडतेस
पण तुही तसचं म्हणं
विजांचा कडकडात होईल, ढ़गांचा गडगडाट होईल
तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोर्‍या शरीराकडे बघ
बघ माझी आठवण येते का?

यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पहायला विसरू नकोस
यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर
यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर
येत्या पावसाळ्यात एक दिवसतरी, बघ माझी आठवण येते का?

मी नसेन तर काय करशील?


एकदा त्याचे आनी तीचे भांदन झाले. तो तीच्यावर रागावून बसला. तीने त्याला समजावण्याचा खुप प्रयत्न केला. पण तो काही एकेच ना! शेवटी ती रागावून म्हणाली..
मी आहे तर इतका रागावतो आहेस, मी नसेन तर काय करशील?

मी नसें तर!!!
ती: तुझ्या आयुष्यात मी नसें तर कसा जगशील?
कोणाच्या डोळ्यात स्वतःला बघशील?
कोणाच्या आसवांना टिपशील?
कोणाच्या निरर्थक गप्पांमधे रमशील?
कोणाच्या ओठांवर हसू फुल्व्शील?
कोना वरून मित्रन्मधे मिराव्शील?

बयिक्ची मागची सिट जेव्हा रिकामी राहिल,
समोरचा आरसाही जेव्हा माझी वाट पाहिल,
ट्राफिक चा घोंगाटही जेव्हा क्षुल्लक वाटेल,
ती १० मिनिटेही तापासराखी भासतील,
संग तेव्हा काय करशील?

कामात बुडवून जरी घेशील स्वतःला,
माझी आठवण येताच…
मोबाईल वर लक्श नकळत जाईल,
पण तो वाजणार नहीं…
तुला कहीतरी चुक्चुक्ल्यासराखे नक्की वाटेल…
संग तेव्हा काय करशील?

दिवस भर दुसर्यांच्या चानाक्स्श नजरेंपासून लपशील..
उगाच किनार्यावर माझी वाट बघशील..
संध्याकाली हुरहुर्शील…
माझ्या आठवणी ने बैचेन होशील..
पण अलगद आपले दुःख पीउन टाकशील…
मावलत्या सुर्याला आपल्या अश्रुंचे अर्ध्य देऊन…

गर्दीतही एकटा राहशील,
पुन्हा पुन्हा मागे पाहशील,
मी नजरेस पडणार नहीं…
हताश होउन जड़ पावलांनी पुढे चलशील..
तू ही त्याच गर्दित हरवून जाशील… कुठेतरी…

तू लाख स्वतःला रमवशिल,
दुसर्याँमधे स्वतःला हरवशील…
नविन नात्यांना जोदशील…. पण..
खरचं सांग…..
“काय मला विसरु शकशील???”

मित्र


एकही मित्र नाही असा माणूस कुठेच नसेल
थोड्या पुरती का होईना प्रत्येकाने मैत्री केली असेलशरीरात रक्त नसेल तरी चालेल पण आयुष्यात मैत्री ही हवीच
कितीही जुनी झाली तरी ती नेहमी वाटते नवीच

रक्ताच्या नात्यात नसेल एवढी मैत्रीच्या नात्यात ओढ असते
कशीही असली तरी शेवटी मैत्री गोड असते.

मैत्री म्हणजे त्याग आहे मैत्री म्हणजे विश्वास आहे
हवा फक्त नावापुरती तर मैत्री खरा श्वास आहे

मैत्रीच्या या नात्या बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे
खरे नात्याला नसले तरी मैत्रिला एक रूप आहे

मैत्रिला कधी गंध नसतो मैत्रीचा फक्त छंद असतो
मैत्री सर्वानी करावी त्यात खरा आनंद असतो