Rahul Sonar

July 27, 2009

आज गोकुळात रंग खेळतो हरी

Lyricist :Suresh Bhat
Singer :Lata Mangeshkar
Music Director :Hridayanath Mangeshkar

गीतकार :सुरेश भट
गायक :लता मंगेशकर
संगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर

आज गोकुळात रंग खेळतो हरी
राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी

तो चटोर चित्तचोर वाट रोखतो
हात ओढूनी खुशाल रंग टाकतो
रंगवून, रंगूनी गुलाल टाकतो
सांगते अजूनही तुला परोपरी

सांग श्याम सुंदरास काय जाहले
रंग टाकल्याविना कुणा न सोडले
ज्यास त्यास रंग रंग रंग लागले
एकटीच वाचशील काय तू तरी

त्या तिथे अनंगरंग रास रंगला
गोपगोपिकांसवे मुकुंद दंगला
तो पहा मृदुंग मंजिर्‍यात वाजला
हाय वाजली फिरुन तीच बासरी

नसे तुझा देह चंदनाचा, न हे तुझे ओठ केशराचे

Filed under: Marathi Poem — Rahul Sonar @ 7:03 am
Tags: , , , , , ,

नसे तुझा देह चंदनाचा, न हे तुझे ओठ केशराचे
पुसून जातात संधिकाली कधी कधी रंग मेकपाचे!

असाच प्रत्येक आरतीतून आणला हा करून चोरी
म्हणून आता तयार झाले घरातले ढीग कापराचे!

करून संसार मी तुझा फक्त भारवाहू हमाल झालो
वहाण माझी अशीच फाटे करून फेरे किती घराचे !

निमूट ऐकून घ्यावयाला कुणीतरी लाडका हवा ना?
रडून ती दाखवी स्वतः का असून काळीज पत्थराचे!

तुझ्यासवे बोलतो तरी मी, तिला कधी भेटलोच नाही
कबूल ह्या प्रेमिकास आता तुझ्यात अस्तित्व सायराचे

कधी कधी मांजरेच काही चढून तोऱ्यात जात होती
घरात झालेच माणसांना उगाच आभास वानराचे!

तुझ्या नि माझ्या झटापटींच्या घडून गेल्या कितीक फेऱ्या
हवीहवीशी तुझी चढाई, असे सदा बोल अंतराचे

[आधारित- कधी तुझा देह चंदनाचा, कधी तुझे ओठ केशराचे- चित्त]
……………… कारकून

Read more:

March 7, 2009

तू निरागस चंद्रमा, तू सखी मधु शर्वरी

तू निरागस चंद्रमा, तू सखी मधु शर्वरी
चांदणे माझ्या मनीचे पसरले क्षितिजावरी

काजळाचे बोट घे तू लावुनी गालावरी
मन्मनीचे भाव सारे उमलले चेहऱ्यावरी
पाहतो जेव्हा तुला मी गजल उमटे अंतरी
शब्द झाले सप्तरंगी झेप घेण्या अंबरी

सागराशी भेटण्या आतूर झाला हा रवी
भवतीचे तेज सारे वाटते दुनिया नवी
हासता तू सूर ही झंकारले वाऱ्यावरी
मी न माझी राहिले ही नशा जादुभरी

March 5, 2009

हल्लीच्या पोरी

Filed under: Marathi Poem — Rahul Sonar @ 11:40 am
Tags: , , , , ,

इश्श्य…… म्हणुन मान खाली
घालतच नाहीत
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत

नवीन ड्रेस का गं ?
विचारले तर ह्यांना येतो संशय !
नही रे जुनाच आहे म्हणुन बदलतात विषय
नकटया नाकावर लटका राग
दिसतच नाही हल्लीच्या पोरी……..
मी घारया डोळ्यांचे कौतुक करावे
मग तिनेही गालात खुद्कन हसावे,
कसले काय……. आजकाल गालांना
खळया कश्या त्या पडतच नाही
हल्लीच्या पोरी…….

उद्या घोडयावर होऊन स्वार
येईल एक उमदा तरुण,
” होशील का माझी राणी”
विचारील हातात हात घेऊन
गोड गोड स्वप्ने यांना आता
पडतच नाहीत हल्लीच्या पोरी……

पोर लग्नाची झाली म्हाणुन
घरी आई बाप काळजीत
“माझा नवरा मी केव्हाच शोधलाय”
त्या डिक्लेअर करतात ऐटीत
घरून होकारासाठी थांबतच
नाहीत हल्लीच्या पोरी …..
मुळी लाजतच नाहित…………

March 4, 2009

Saundarya

Filed under: Marathi Poem — Rahul Sonar @ 10:26 am
Tags: , , , ,

Next Page »

Blog at WordPress.com.